मंगळवेढा प्रतिनिधी
ईद ए मिलाद निमित्त सलग 11वर्षे रक्तदान शिबिर घेवून ईलाई नगर मंगळवेढा येथील मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे कौतुकोद्गार खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी काढले.
ईद-ए-मिलाद निमित्त मंगळवेढा येथील ईलाही नगर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले. ईद ए मिलाद जुलूस समिती ईलाहीनगर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सलग 11व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच यावेळी मिठाई वाटप व मिष्टान्न भोजन देण्यात आले होते. दुपारपर्यंत 55जणांनी रक्तदान केले होते.
यावेळी ईद-ए-मिलाद कमिटीचे अध्यक्ष शकील पठाण, सरपंच जमीर सुतार, माजी नगरसेवक बाळू महमंद सुतार, रजाक पठाण गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन ओमणे, दिलीप उगाडे, बसवेश्वर माळी, लक्ष्मण बाबर, मन्सूर पठाण, साजिद मुजावर, जावेद मुजावर, इमरान सुतार, सरताज शेख, अमीर शेख, सैफान शेख, सैफन सुतार, आलिफ सुतार, कय्युम सुतार, रियाज सुतार, आसिफ तांबोळी, फरीद शेख, हसीन शेख, अमीर मुलानी, जावेद सुतार, मारुती भोसले आदी उपस्थित होते