मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक काढली अंत्ययात्रा

दामाजी चौकात उरकला अंत्यविधी

मंगळवेढा प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 14 रोजी बैलपोळ्याच्या सणादिवशी मंगळवेढा येथे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून प्रतिमेचा अंत्यविधी करण्यात आला.यावेळी मराठा समाजातील अनेकांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
         

मराठा आरक्षण मिळावे यासाठी राज्यात सगळीकडे विविध माध्यमातून आंदोलने सुरू आहेत त्यात मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 12पासून दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत विविध प्रकारची आंदोलने साखळी पद्धतीने केली जात आहेत. आज दिनांक 14 रोजी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक ते पुन्हा दामाजी चौकात आणण्यात आली. यावेळी दामाजी चौकात त्या प्रतिमेचे दहन करून अंत्यविधी करण्यात आला               

        यावेळी अनेक मराठा युवकांनी सरकारच्या नावाने बोंब मारत आरक्षण दिलेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, केंद्राकडून व राज्याकडून आरक्षणाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी मराठा समाजातील युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनातून येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या मागणीची तीव्रता सरकार पुढे मांडण्यात आली. हे आंदोलन पुढील काळात देखील सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Comments (0)
Add Comment