माजी सभापती कै भगवानराव भाकरे यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त आंधळगावात विविध कार्यक्रम

आंधळगाव प्रतिनिधी
मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै भगवानराव भाकरे यांच्या 21व्या पुण्यतिथीनिमित्त आंधळगाव येथे दिनांक 31ऑगस्ट रोजी कै. भगवानराव भाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.                   

    सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन राजमाता बँकेचे चेअरमन डॉ. अशोक सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम कै भगवानराव भाकरे दुध संस्था आंधळगाव येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे.तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाकरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment