…अखेर प्रशासन नमले

घरजागा नोंदीच्या संदर्भात तत्काळ सुनावणी घेण्याचे गटविकास अधिकारयाकडून आश्वासन, शेलेवाडी येथील वैशाली माने यांचे उपोषण मागे

 

मंगळवेढा प्रतिनिधी
         शेलेवाडी येथील वैशाली दिनकर माने यांच्या घरजागेच्या संदर्भात
गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा यांच्याकडून दाखल तक्रारीवर वारंवार मागणी करून सुध्दा सुनावणीस टाळाटाळ करणाऱ्या व सुनावणी घेण्याच्या मागणीसाठी शेलेवाडी येथील वैशाली माने ह्या स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती मंगळवेढा येथे उपोषणास बसल्याने प्रशासनाला अखेर जाग आली.व घरजागेच्या संदर्भात तत्काळ सुनावणी घेण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी पाटील यांनी दिल्याने वैशाली माने यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की शेलवाडी येथील वैशाली दिनकर माने या रहिवासी असून त्यांचे नावे शेलेवाडी ग्रामपंचायत मालमता क्र. १५३ ही घरजागा आहे. सदरची घरजागा सन २०२२ मध्ये शामराव देवबा पाटील यांचेकडून रजिस्टर खरेदी खताने खरेदी केलेली आहे.सदर जागेची नोंद माझ्या नांवे झाली असून सदर जागेच्या सिटीसव्र्व्हे (नं. १०६) वर सुध्दा माने यांचे नांव दाखल झाले आहे. सदर ठिकाणी त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्याचा रक्कम रु 15हजाराचा पहिला हप्ता सुध्दा मिळालेला आहे. असे असताना जागेच्या
नोंदीविरोधात मारुती देवबा
पाटील यांनी तक्रार केली होती.

        सदर तक्रारीच्या चौकशीमध्ये मुळ मालक शामराव देवबा पाटील यांनी सदर जागा खुष खरेदी दिली आहे असा जबाब दिला असताना सुध्दा मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सदर बाबत सुनावणी घेत नसल्याने घर जागेतील घरकुलास पुढील हप्ता सुध्दा देत नाहीत त्यामुळे बांधकाम रखडले असल्याने सदर तक्रारीची चौकशी व सुनावणी पूर्ण करून घरकुल हप्त्याची पुढील रक्कम मिळावी या मागणीसाठी माने ह्या मंगळवेढा पंचायत समिती समोर उपोषणास बसल्या होत्या. याची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी सदर उपोषण कर्त्या महिलेची कर्त्या महिलेची भेट घेऊन या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेऊ असे लेखीआश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.यावेळी गटविकास अधिकारी श्री. पाटील विस्ताराधिकारी नरळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील वेळापुरे,सचिन येडसे,अण्णा सावंत  उपस्थित होते.

कोट

सोलापूर मिरर च्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे होत आमच्या उपोषणाची गटविकास अधिकारी पाटील साहेब यांनी  उशिरा का होईना दखल घेत तत्काळ सुनावणी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करीत असून  प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे न्याय द्यावा.

–वैशाली माने, उपोषण कर्त्या

Comments (0)
Add Comment