मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा ही गुणवंत व प्रज्ञावंतांची भूमी असून अभिज्ञा राक्षे हिने दहावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. भविष्यकाळात तिने अभ्यासात सातत्य ठेवत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्याचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन खरेदी विक्री संघाचे चेअरमन दामाजीचे संचालक सिद्धेश्वर आवताडे यांनी केले.
इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेची विद्यार्थी अभिज्ञा वीरेंद्र राक्षे हिने इयत्ता 10 वी (s.s.c.) बोर्ड परीक्षेत 100% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व मार्गदर्शक वीरेंद्र राक्षे (सर), सुनिता वीरेंद्र राक्षे(मॅडम)यांचा सत्कार तालुक्याचे नेते तथा सोलापूर डीसीसी बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे यांच्या हस्ते शाल व फेटा पुष्पहार देऊन शुभेच्छा पर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आवताडे बोलत होते.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा संत दामाजी कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर आवताडे, मंगळवेढा मार्केट कमिटी सभापती सुशिल आवताडे, संत दामाजी नगर ग्रा.पं.सरपंच जमिर(भाई)सुतार, संत दामाजी नगर ग्रा.पं.उपसरपंच संजय जगताप,दिलिप उगाडे,सागर जाधव, विठ्ठल जावळे, सचिन गडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.