मंगळवेढा प्रतिनिधी
अवकाळी वादळामुळे नुकसान ग्रस्त तालुक्याच्या पश्चिम भागातील लक्ष्मी दहिवडी गुंजेगाव मारापुर या भागतील शेतातील पिके,घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा श्री संत दामाजी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सिद्धेश्वर आवताडे यांनी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे केली आहे.
गेल्या दोन दिवसात तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व वादळाचा तडाका मोठ्या प्रमाणात बसला आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी दक्षिण भागातील सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, लवंगी या गावाला तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, महमदाबाद शे,मारापुर, या भागात वादळाचा तडका बसला आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पाहणी करत शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक मदतीचा हात दिला वादळामुळे शेतातील आंबा, द्राक्षे,डाळिंब या पिकाचे तर लक्ष्मी दहिवडी येथे लोकांचे राहत्या घराचे व जनावराच्या शेडचे देखील पत्रे उडून गेले आहेत. गुंजेगाव येथे विजेचा ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाला. मारापुर येथे आंबा पिकाचे व एका शेतकऱ्याच्या झाड घरावर पडले आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जनजीवन कोलमडले आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी महसूल विभागाने फक्त आंधळगाव आणि भोसे या दोन महसूल मंडलात पंचनामे केले होते परंतु त्या मंडळ मधील देखील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. परंतु आणखी वादळाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे मागील नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत त्याची पुनरावर्ती न करता महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी सिद्धेश्वर अवताडे यांनी केली आहे.