लाचप्रकरणातील आरोपी तलाठी नळेसह झिरो कर्मचारयाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

 

मंगळवेढा प्रतिनिधी

सांगली- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणातील आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे व झिरो कर्मचारी पंकज चव्हाण या दोघांचा जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लंबे यांनी फेटाळला आहे.
              या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी तथा तक्रारदार यांची कमलापूर हद्दीतील गट क्र.52 मधून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने नुकसान भरपाईपोटी 1 लाख 43 हजार 794 रुपये मंजूर झाले होते. ही रक्कम देण्यासाठी झिरो कर्मचारी तथा दलाल पंकज चव्हाण (रा.शेलेवाडी)याच्यामार्फत 7 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.ती रक्कम तलाठी सुरज नळे यांनी स्विकारून सरकारी कामात अडथळा आणत चार चाकी वाहनातून लाच लुचपत पथकाला पाहताच पलायन केले होते. आरोपीला प्रथमतः चार दिवसाची व व्दितीय वेळेस एक दिवसाची अशी पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती.त्याची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्याने आज दि.18 रोजी मुदत संपल्याने तलाठी आरोपी व झिरो कर्मचारी या दोघांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.

       सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.सारंग वांगीकर यांनी आरोपी हा पैसे घेवून फरार झाला होता.तसेच जामीन मिळाल्यावर दबाव आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन मंजूर करू नये तसेच तपास अधिकारी पोलिस निरिक्षक महाडिक यांनीही तपास भक्कम पध्दतीने करून न्यायालयापुढे सबळ पुरावे मांडल्यामुळे सरकारी वकिल व तपास अधिकारी तसेच फिर्यादीचे वकिल अ‍ॅड.दिपक माने,अ‍ॅड.सुहास कदम,अ‍ॅड.विजय बेंदगुडे,अ‍ॅड.सुमीत साळुंखे,अ‍ॅड.शक्तीमान माने,अ‍ॅड.अमोल आवताडे यांनी बाजू मांडल्याने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.निलेश जोशी यांनी काम पाहिले.

Comments (0)
Add Comment